मेढा केंद्राच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा संपन्न


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

 

मामुर्डी : दि .२४ आय.एस.ओ. मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे मेढा केंद्राच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धांचे तालुकास्तरीय आयोजन करण्यात आले होते.

मेढा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सुरेश धनावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री.बजरंग चौधरी, ग्रामपंचायत सदस्य श्री.बाजीराव धनावडे, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती मामुर्डी , ग्रामस्थ मामुर्डी यांचे उपस्थित स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

ADVERTISEMENT

खो-खो, कबड्डी, लंगडी,रिले, अश्या सांघिक स्पर्धा तर धावणे,योगासने,बुद्धिबळ,लांब उडी, थाळी फेक,गोळा फेक अश्या वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत केंद्रातील सर्व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.सर्व शिक्षकांनी स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. स्पर्धेचा वरूनराजाने सुद्धा आनंद लुटला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!