भाटघर धरण भागात कोट्यावधींच्या निधीतून विकास कामे-आ.संग्राम थोपटे.
दि. 30 भोर : २०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील मळे -भुतोंडे, संगमनेर – जोगवडी भागातील गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले दौरा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूतोंडे गावातील सेनापती येसाजी कंक वाडा येथील त्यांच्या स्मारकास अभिवादन करून सुरुवात केली, या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यासाठी पुरातत्त्व विभाग, केंद्र व राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे.
भूतोंडे व लव्हेरी माजगाव येथे प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राची उभारणी करून आरोग्य सेवा उपलब्ध करता आली, भाटघर धरण प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून धरणग्रस्तांना खापर पंतू पर्यंत प्रकल्पग्रस्त दाखले मिळवून देण्यात आले याचा शासकीय सेवेत भरतीसाठी अनेकांना लाभ झाला.
१८ नागरी सुविधा अंतर्गत कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून गावागावतील सभामंडप, रस्ते काँक्रिटिकारण, स्मशानभूमी व या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने दोन्ही तिर जोडण्यासाठी नवीन पुलाची मागणी केली आहे तसेच महत्त्वाचा असलेला रस्ता संगमनेर-माळवाडी-हर्णस- -जोगवडी-मळे-भुतोंडे या रस्त्याचे काम तब्ब्ल २४ कोटी निधी उपलब्ध करून मार्गी लावता आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मानसिंग धुमाळ, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, बाळासाहेब थोपटे, विठ्ठल वरखडे, विठ्ठल आवाळे, काळूराम मळेकर, वसंतराव वरखडे, सुवर्णा मळेकर, अंकुश खंडाळे, सागर सुके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.


