प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका उपाध्यक्षपदी पुन्हा अजय कांबळे यांची निवड.
मुख्य संपादक मंगेश पवार
कार्यकारी संपादक सागर खुडे
दि. 14 पुणे :- मा. बच्चूभाऊ कडू, संस्थापक अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार, I.B. गेस्ट हाऊस, पुणे येथे पक्षाच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीची निवड पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीस राज्य समन्वयक गौरव जाधव उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा व तालुका अध्यक्षांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सर्व नविन पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, त्यांनी संघटन बळकटीकरण, युवकांमध्ये जनजागृती आणि समाजातील शोषित-वंचित घटकांपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवण्याचे ठरवले आहे.

या कार्यक्रमात अजय रुपचंद कांबळे यांची भोर तालुका उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या गत कार्यकाळातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत, पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेचा आवाज बनावा, हीच कार्यकारिणीची दिशा असून, येत्या काळात गावागावात संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल असे नवनियुक्त प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी सांगितले आहे.



