जळगांव जिल्हा हादरला…! प्रेम विवाह केल्याच्या रागातून बापाकडूंन गोळीबार मुलीला संपविले, तर जावई गंभीर जखमी,
संभाजी पुरीगोसावी (जळगाव जिल्हा) प्रतिनिधी.
जळगांव जिल्ह्यात प्रेम विवाह केल्याच्या रागांतून सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण अर्जुन मांगले (वय 48) रा.शिरपूर) यांनी आपल्या मुलीवर आणि जावयावर लग्न समारंभात गोळीबार केलाय यामध्ये मुलगी जागीच ठार झाली असून. तर जावई गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना चोपडा शहरांतून समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगांव जिल्हा हादरला आहे. ऑनर किलिंग घटनेने संतप्त लोकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याने त्याचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर जळगांव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने सीआरएफ मधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या एका कार्यक्रमात बिछूट गोळीबार केला या गोळीबारात मुलगी तृप्ती अविनाश वाघ (वय 24) हिचा जागीच मृत्यू झाला. तर अविनाश ईश्वर वाघ (वय 28) जावई गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह चोपडा शहर पोलीस ठाणेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सौ. तृप्ती अविनाश वाघ आणि पती अविनाश ईश्वर वाघ या दोघांचा एक वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दोघेही पुणे शहरांत वास्तव्यास होते. मात्र या दोघांचा प्रेमविवाह तृप्ती हिच्या वडिलांना पसंत नव्हता आणि आणि हे दाम्पत्य आज चोपडा शहरांत येथे अविनाश वाघ यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी दोघे आले होते. याचवेळी मुलीने केलेल्या प्रेम विवाहाच्या रागांतून बापानेच गोळीबार करत मुलीला संपविले तर जावई अविनाश वाघ हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जळगांव जिल्हा चांगलाच हादरला आहे. अधिक तपास स्वतः पोलीस अधीक्षकांसह चोपडा शहर पोलीस ठाणेचे अधिकारी करीत आहेत.