जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरोबा वस्ती स्पर्धेत राजवीर वाघमारे प्रथम क्रमांकाचे मानकरी


 

संपादक दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरोबा वस्ती येथे डी .के. चेस. अकॅडमी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती निमित्त इयत्ता चौथी चा वर्गातील लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये लेखी स्वरूपाचा पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आला होता या स्पर्धेमध्ये गुणांच्या आधारे राजवीर वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटवून विजय मिळवला द्वितीय क्रमांक वेदांत क्षीरसागर तृतीय क्रमांक प्रतीक शेळके चतुरता क्रमांक संघर्ष शेळके पंचम क्रमांक शरण्या बोडके अथर्व केसकर हे यशस्वी विद्यार्थी झाले आहेत पहिले पाच क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी नामवंत डॉक्टर मकरंद डोंबाळे. माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील. धनपाल शेळके पाटील. दीपक क्षीरसागर. दिलीप घाडगे .व इतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या हस्ते वरील सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते या विद्यार्थ्यांना खंडाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गजानन आडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याबद्दल तालुक्यात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!