कापूरहोळ(भोर )येथे शेतकरी आणि कार्यकर्ते मेळावा : शरद पवार,बाळासाहेब थोरात,आणि संजय राऊत उपस्थित राहणार.
भोर प्रतिनिधी : राजेंद्र वाघमारे
भोर :कापूरहोळ हरिश्चंद्री मैदानामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, उबाठा शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत, काँग्रेसचे जेष्ट नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत,भोर वेल्हा तालुक्यातील शेतकरी, कार्यकतें व महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा होणार असल्याची माहिती भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांनी चिंतामणी हॉटेल केळावडे येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, यावेळी महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, शिवसेना अध्यक्ष माऊली शिंदे,
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अध्यक्ष रविंद्र बांदल,तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडीची पहिल्यांदाच सभा भोर तालुक्यात होत असल्याने तालुक्यातील शेतकरी तीनही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन थोपटे यांनी केले आहे. तर जनता मतदार सुज्ञ आहेत ते योग्य तो निर्णय घेतील व विरोधकांना त्यांची जागा दाखवतील तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भोर विधानसभेतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचंनार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले,
९ मार्च रोजी सायंकाळी ४:०० वाजता कापूरहोळ हरिश्चंद्री मैदानात शेतकरी व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तरुण जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन भोर तालुका महाविकास आघाडीने या वेळी केले. राष्ट्रवादी फुटिनंतर शरद पवार पहिल्यांदाच भोर तालुक्यात सभा घेणार आहेत होणाऱ्या सभे मध्ये प्रमुख नेते काय भाष्य करणार आहेत, तसेच महविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल,तर महाविकास आघाडीचा प्रचार कशा स्वरूपात असणार आहे,असे अनेक प्रश्न कार्यकर्ते व मतदारांना पडलेले आहेत. तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


