धाराशिव येथील ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.


 

मुंबई प्रतिनिधी : शंकर माने

धाराशिव येथे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आज शुक्रवार दि.१५ मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते वर्षा निवासस्थानावरून दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब त्यांच्यासमवेत उपस्थित राहिले.

राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच स्वतंत्र सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्यातील जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये यांचा कायापालट करण्यात येत असून या ठिकाणी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार प्रयत्नशील आहे. धाराशिव येथे उभारण्यात येत असलेले ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय हे त्याचेच एक उदाहरण आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट होऊन सर्वसामान्यांना दर्जेदार आणि कमी खर्चात सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

 

 

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. डॉ. तानाजी सावंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. संजयजी बनसोडे, आमदार मा. मंदाताई म्हात्रे, मा. मनीषाताई कायंदे, मा. राजेशजी पवार, मा. बालाजी कल्याणकर, माजी मंत्री मा. रामदासजी कदम, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!