खंडाळा- लोणी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अमित कदम यांच्या आयोजित महिलांसाठी होममिनिस्टर कार्यक्रम संपन्न.


 

खंडाळा (सातारा) प्रतिनिधी : बाळू धायगुडे

खंडाळा तालुक्यातील लोणी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अमित उर्फ बिरा शेठ कदम यांनी लोणी आणि परिसरातील महिलांसाठी महिलादिनाचे औचित्य साधत खास महिलांसाठी होममिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन लोणी ता.खंडाळा जि.सातारा येथे केले होते.या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येत उत्साहात सहभागी होवून आनंद लुटला.यावेळी महिलांसाठी आयोजित वेगवेगळे स्पर्धात्मक खेळ तसेच उखाणे स्पर्धा मनोरंजनासाठी साऊंड सिस्टीमवर नृत्य याचा महिलांसह बालगोपाळांनी आनंद लुटला.कार्यक्रमातील उखाणे स्पर्धा वेगवेगळ्या खेळातील विजेत्या महिलांना अनेक पारितोशिके बक्षिस म्हणून देण्यात आली.यामधे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पुष्पा मोहन भोसले यांना तर द्वितीय क्रमांक अश्विनी सचिन कदम,तृतीय क्रमांक आशाताई नरेंद्र भोसले,चतुर्थ क्रमांक ज्योती अमोल घुले व पंचम क्रमांक सुरेखा मधुकर कदम या महिलांनी बक्षीसे जिंकली.त्यांना अनुक्रमे एलईडी,फ्रिज,आटाचक्की,कुलर आणि मिक्सर अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.तसेच एक लकी ड्राॅ बक्षिस टेबल फॅन ठेवण्यात आले होते. सुनंदा चंद्रकांत भोसले यांना हे बक्षिस देण्यात आले.उपस्थित सर्वच महिलांना एक खास भेटवस्तू देण्यात आली.

ADVERTISEMENT

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक रामदास कांबळे,माजी जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे,युवासेना जिल्हाप्रमुख माऊली पिसाळ,उपजिल्हाप्रमुख अजित यादव,सागर कदम,बाळकृष्ण कदम,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खंडाळा तालुकाध्यक्षा आशाताई भोसले,मंदाकिनी भोसले,यशवंत कदम,सुजाता कदम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी महिलांना देण्यात आलेली बक्षिसे सचिन शेडगे,भूषण ढमाळ,शुभम लाड,नितीन साळुंखे,बंडा भोसले,संकेत कदम,शंभूराज साळुंखे आणि भोळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विशाल चव्हाण आदींच्या सौजन्याने देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सादरीकरण भुईंज येथील मयुरी पिसाळ यांनी अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने केले.यावेळी त्यांनी महिलासाठी उखाणा,तळ्यात मळ्यात,बादलीत चेडू टाकणे,फुगे फोडणे,चेंडूने ग्लास पाडणे,टिकली कपाळावर लावणे,सासर माहेर असे वेगवेगळे खेळ घेवून धमाल केली.महिलांनी देखील प्रत्येक खेळात उत्सफुर्तपणे सहभाग नोदवत आनंद लुटला.

जवळपास ३०० महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.उपस्थित प्रत्येक महिलेस खास भेटवस्तू देण्यात आली.यासाठी प्रशांत गोळे व अजित साळुंखे यांचे विशेष सहकार्य लाभले.दरवर्षी महिलासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांनी करावे अशा भावना यावेळी अनेक महिलांनी बोलून दाखवल्या.या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अमित उर्फ बिराशेठ कदम यांचे विशेष कौतुक करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडा भोसले,पोलीस पाटील संतोष कदम,ऋषभ कदम,स्वस्तिक पवार,ओम कदम,विक्रम मोहिते,अक्षय कदम,ओंकार कदम,निखिल कदम,विनायक लिमण,राज कदम आदींनी विशेष मेहनत घेतली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!