आशा किरण सोशल फाउंडेशन अंतर्गत शालेय वस्तू वाटप उपक्रम


 

किकवी प्रतिनिधी :काळेवाडी ता. भोर जि. पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड व पेन वाटप दि.6/4/24 रोजी आशा किरण सोशल फाउंडेशन अंतर्गत करणार आहेत.

शाळकरी चिमुकल्यांचे प्रोत्सहान वाढवायचे म्हणजेच काय तर तुम्ही आम्ही किंबहुना आपल्यापैकी सर्व शाळेत गेलोच आहोत, तेव्हा आपल्या सर्वांची एक इच्छा असायची कि परीक्षेला जाताना आपल्याकडे नवीन पॅड व सुंदर पेन आपल्याकडे असावा, अशी छोटीशी इच्छा सर्वांची पूर्ण होते अस नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच कि दि. 6 एप्रिल 2024 रोजी आम्ही भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काळेवाडी येथे भेट देऊन तिथल्या मुलांना वार्षिक परीक्षेसाठी एक नवीन पॅड व सुंदर पेन देऊन त्यांचा आत्मविश्वास व शाळा विषयाची आवड वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत….एकंदरीत परिस्थिती पाहता एक गोष्ट लक्षात आली कि जी आपली इच्छा असायची ती काही लहान मुलांची स्वप्ने आहेत.
चला तर मग आमच्यासोबत
तुम्ही सुद्धा तुमच्या राहिलेल्या इच्छा ह्या चिमुकल्यामार्फत पूर्ण करूयात.

ADVERTISEMENT

 


असे आशा किरण सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुप्रिया साळेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सुवर्णा काळे ग्रा. सदस्य काळेवाडी, मा. डॉ. नितेश पुणेकर, पुणेकर आय केअर अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकआणि आशा किरण सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष किरण साळेकर हे उपस्थित राहणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!