शिवशक्ती क्रीडा मंडळ बिभवी यांच्या वतीने गणेश उत्सव विविध कार्यक्रमाने संपन्न
प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मेढा दि.७ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावली तालुक्यातील बिभवी येथील शिवशक्ती क्रीडा मंडळ बिभवी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन पर्यावरण पूरक सजावट करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते .
बुधवार दिनांक २७ रोजी श्री मूर्ती ची प्रतिष्ठापना करून दररोजभजन कीर्तन व विविध प्रबोधन पर कार्यक्रम यांचे आयोजन केले होते
मंगळवार दि. सकाळी महाआरती ( घरगुती गौरी विसर्जन ) सायंकाळी ८ ते ९ वाजता महाआरती रात्री मंडळातील महिलांसाठी
हळदी कुंकू समारंभ, संगीत खुर्ची, गरबा, अशा दोन-तीन स्पर्धेचे आयोजन केले होते
बुधवार दि. ३ रोजी सकाळी महाआरती व रात्री ८ ते ९ महाआरती ९ नंतर मराठी संस्कृती जपणारा जूनं फर्निचर हा चित्रपट अबाल वृद्धांना . दाखविणेत आला .
गुरुवार दि. ४ रोजी रात्री भजनी भारुड मंडळ चिंचणेर यांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
शुक्रवार दि. ५ रोजी मंडळाच्या वतीने अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे . आयोजन केले या रक्तदानासाठी ११० रक्तदात्यांनी रक्तदान देऊन आपले कर्तव्य बजावले .याच दिवशी सत्यनारायन महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करणेत आले होते
सायंकाळी ८ ते १० भजन मंडळ बिभवी यांचा सुस्वर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
शनिवार दि.६ रोजी गणपती विसर्जन सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आले .
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेषकरून महिलांनी हिरव्या कलरच्या पैठणी नेसून फुगड्या , झिंमा , गरबा दांडिया खेळून जुन्यारूढी परंपरेला उजळा दिला संपूर्ण गणेशोत्सव आनंदात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी व मुंबईकर मंडळींनी अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम निर्विघ्न पणे पूर्ण केला याबद्दल ग्रामस्थ मंडळ बिभवी व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित लोकांनी मंडळाचे कौतुक व अभिनंदन केले .