अज्ञात चोरट्याने संगमनेर येथील दुचाकी चोरली.


 

भोर :तालुक्यातील संगमनेर गावात दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली.याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथे दि.18/3/24 रोजी अंधाराचा फायदा घेऊन रात्री 12:45 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 : 00 सुमारास फिर्यादी किरण धुमाळ यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत पाहिले असता मोटरसायकल दिसली नाही. त्यांच्या होंडा कंपनीची सीबी शाईन मोटरसायकल नंबर MH 12 HM 2665 ही मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. म्हणून किरण धुमाळ फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पो. ना. लडकत करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!