खंडाळा- सुनिल देशमुख यांची शिरवळ राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी निवड.


 

शिरवळ : बाळू धायगुडे

दि.३१,खंडाळा (सातारा) राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या शिरवळ शहराध्यक्षपदी सुनिल(काका) देशमुख यांची निवड करण्यात आल्याने शिरवळ राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शरद पवार पक्षातील कार्यकर्त्यांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीत अजित पवार यांचे बंडानंतर राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनिल माने यांनी पक्षाची नव्याने बांधणी करताना जिल्ह्यातील विविध पदाधिका-यांच्या निवडी नुकत्याच जाहिर केल्या आहेत.

ADVERTISEMENT

शिरवळ शहर राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाचे नुतन शहराध्यक्ष म्हणून शिरवळ नगरीचे जेष्ठ नेते माजी उपसरपंच सुनिल (काका) देशमुख यांना नुकतेच निवडीचे पत्र देवून त्यांचा सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या निवडीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते डाॅ.नितीन सावंत यांनी खास भेट घेवून अभिनंदन केले.तसेच वरीष्ठ पदाधिकारी,कार्यकर्तेसह शिरवळ राष्ट्रवादी पार्टी शरद पवार पक्षातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

पक्षाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत पक्षाची देहधोरणे समाजात तळागाळापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे सुनिल देशमुख यांनी या निवडीनंतर आपले विचार मांडताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!