खंडाळा- राम चव्हाण खंडाळा तालुक्याचे महान सुपुत्र – डाॅ.विजय शिंदे.
खंडाळा सातारा प्रतिनिधी : धर्मेद्र वर्पे.
नुकतेच असवली येथे संत शिक्षण संस्थेच्या पु बापूजी साळुंखे विद्यालयात रामचंद्र चव्हाण व दिवंगत सदस्य यांचा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे बोलताना खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानचे सचिव व शिरवळ जिमखाना अध्यक्ष डॉ.विजय शिंदे म्हणाले असवली हे वैचारीक श्रीमंती व पुरोगामी विचार असणाऱ्या नररत्नांची खाण आहे रामचंद्र चव्हाण हे त्यापैकी एक रत्न होते ते खंडाळा तालुक्याचे महान सुपुत्र होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढमाळ होते.
राम चव्हाण साहेबांनी शासकीय सेवेत असताना १९७२ साली वीर विश्रामगृहात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक जलसंधारण साठी २० दशलक्ष वरून १ लाख दशलक्ष क्षमतेची छोटे बंधारे बांधण्याची योजना सादर केली यामुळे १९७२ च्या दुष्काळात महाराष्ट्रात हजारो बंधाऱ्यांची निर्मिती झाली केन्द्र सरकारने त्यांची निवड शेती पाण्याचा योग्य वापर यासाठी परदेशी अभ्यास दो-यासाठी केली यातुनच भारतभर फवारा सिंचन व ठिबक सिंचन पुढील काळात सुरू झाले १९७४ साली यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक व शरद पवार यांना दुष्काळग्रस्त खंडाळा तालुक्यासाठी निरा-देवधर योजना तयार करून सादर केली त्यास मान्यता घेतली. या योजनेची मुळ संकल्पना त्यांचीच होती आपल्या सहाध्यांयांना व मित्रपरिवार बरोबर घेऊन अनेक संस्थांची निर्मिती केली १९८२ साली संत शिक्षण संस्थेची स्थापना केली यावेळी शिवाजीराव ढमाळ, व दत्तात्रेय शंकर ढमाळ यांनी त्यांना मोलाची साथ दिली त्याचबरोबर १९८३ साली शिरवळ येथे तालुक्यातील पहिले महाविद्यालय प्राचार्य बिरबल शिंदे व इतरांना बरोबर घेऊन स्थापन केले व मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला
साहेबांनी विविध संस्थांमध्ये काम केले त्याचे नेतृत्व केले रयत शिक्षण संस्था ,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,कृषी विकास प्रतिष्ठान बारामती अफार्म पुणे,देवदेवेश्वर संस्थान सारसबाग पुणे,प्रोग्रेसिव ड्रॅमेटीक असोसिएशन (पीडीए) पुणे ,मराठा सेवा संघ पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, खंडाळा विभाग शिक्षण समिती, खंडाळा सहकारी साखर कारखाना अशा विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम केले समाजसेवा,शिक्षण शेती,नाट्य ,जलसंधारण ,सिंचन ,खेळ ,सहकार, अध्यात्म, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रात त्यांचा सहज वावर होता त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी,चतुरस्त्र व अष्टपैलू असे होते ते व्यक्ती नव्हते तर संस्था होते.
शासकीय सेवेत मुदतवाढ मिळाली असताना ती नाकारून अधीक्षक अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानची स्थापना केली व तालुक्यातील सिंचन,जलसंधारण, शेती, दुग्ध व पशुपालन, मेषपालन याबाबतीत तालुक्यात कामे केली.
यावेळी मुख्याध्यापक गुरव यांनी स्वागत केले संस्थेची सचिव उत्तम ढमाळ,सातारा मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, सदस्य अनिल ढमाळ यांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक कंकाळ यांनी आभार प्रदर्शन केले.