अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील पसरणी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर वाई पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि.५ रोजी १२ वा. सुमारास पसरणी येथे वेताळ मळा येथील टपरीचा आडोशाला संदीप कुचेकर याच्याजवळ १२६०/- रू. देशी दारूच्या १८० मीलीच्या १८ बाटल्या सापडल्या म्हणून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत वाई पोलीस स्टेशन मध्ये कारवाई करण्यात आली याचा अधिक तपास पोहवा शिंदे करत आहेत.


