भोरमध्ये महाविकास आघाडीची बारामतीच्या लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळेसाठी जोरदार सभा


भोर : देशातील सर्वात चर्चेची निवडणूक म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघ,बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरमध्ये महाविकास आघाडीची सभा रविवार दि.५मे रोजी झाली.
या सभेत बोलताना संग्राम थोपटे यांनी विरोधकांवरती टीका केली. नीरा देवधर धरण, राजगड कारखाना, भोर एसटी स्टँड, चाफेड गुंजवणी प्रकल्प आणि आत्ताचा सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे भोर एमआयडीसी हे आत्ताच का आठवते यांना,याआधी अजित पवार १५ वर्षे पालकमंत्री होते .२ वेळा उपमुख्यमंत्री होते,आज येथे येऊन सांगतात लोकप्रतिनिधी काय करतात. यावेळी थोपटेंनी सांगितले  की ३ टर्म संग्राम थोपटे आणि काँग्रेस पक्ष आघाडीचे धर्म पाळण्याचे काम केले आहे. खरा राजगड कारखाना अडचणीत आणण्याचे काम कोणी केले हे सर्वांना माहिती आहे. इतर कारखान्यांना २०० ते ४०० कोटी कर्ज देता. आम्ही साध ५० ते १०० कोटी कर्ज मागितले की तुम्ही नियमांचा पाढा वाचून अडचण काढतात, येथे येऊन सांगतात की सोमेश्वरला हा भाव आणि राजगडला किती भाव शेवटी विरोधकांना सांगायचे आहे की, आम्ही राजगड कारखाना स्वाभिमानाने उभा केलेला कारखाना आहे. कारखाना तळ हाताच्या फोडाप्रमाणे ३० वर्ष जपला आहे. खरंतर दुसरा कोणता मुद्दाच नाही राहिलं नसेल त्यामुळे भोर एमआयडीसी बाबत बोलतात. विरोधाक लोकसभेची निवडणूक झाली की एमआयडीसी ची फाईल मागवणार आणि लगेच सही करणार.
पुढे बोलताना सांगितले की भोर एसटी स्टँड साठी १ कोटी ३९ लाख रुपयांची नवी इमारतीच भूमिपूजन केलं पण विरोधकांना याची कल्पना देखील चिठ्ठी पुरवणाऱ्यानी दिली नाही.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीच्या सभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नाना पटोले, सुनील केदार, खासदार अमोल कोल्हे, भोर राजगड मुळशी आमदार संग्राम थोपटे, महेश टापरे, विठ्ठल आवाळे, दुर्गा चोरगे आणि महाविकास आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही सभा झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!