पुणे येथून अपहरण केलेली मुलगी नातेवाईकांच्या ताब्यात! चाफळ पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
प्रतिनिधी: शंकर माने चाफळ
पुणे येथून अपहरण केलेली अल्पवयीन मुलगी शोधा शोध करून सापडत नव्हती मात्र मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे चाफळ विभागातील एका गावात संबंधित मुलीच्या नातेवाईकाकडे सापडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील युवकाने पुणे येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आहे याबाबत गुन्हा संबंधित युवकावर सिंहगड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे .पोलीस व नातेवाईक यांनी सर्वत्र शोधाशोध करूनही सदर मुलगी सापडत नव्हती सदर मल्हार पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले. यांच्या मार्गदर्शनाखाली अपहरीत मुलगी पूजा मनसराम मरस कोले वय 17 वर्षे हिचा मल्हारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेतला. असता सदर मुलगी पूजा मरसकोले ही चाफळ भागात मिळून आलेने सदर मुलगीस ताब्यात घेऊन सिंहगड चे पोलीस हवालदार गायकवाड व तिचे नातेवाईक याचे ताब्यात सुखरूप दिली आहे सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ व पो. कॉ.सिद्धनाथ शेडगे सदर युवकाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


