गुरुकुल स्पोर्टस ॲकॅडमीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा.
महाबळेश्वर / सातारा : धर्मेंद्र वर्पे
गुरूकुल स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा.
राज्यस्तरिय ढाल-तलवार, लाठी, भाला,दांडपट्टा स्पर्धेत जिंकली ७ सुवर्ण,२ रौप्य व २ कास्य पदके.
कलारिप्पयट्टू हा आपल्या भारतातील केरळ राज्यातील ३००० ते ५००० वर्षांपूर्वीची एक प्राचीन मार्शल आर्ट आहे.या मार्शल आर्टमध्ये ढाल-तलवार, लाठी,भाला,दांडपट्टा इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते.
आम्हाला आनंद आहे की २ री राज्यस्तरीय कलारिप्पयट्टू महासंघ २०२४-२५ हि स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण झाली आहे,या स्पर्धेचे आयोजन एलिशियन रिसॉर्ट,पांचगणी,तालुका महाबळेश्वर,जिल्हा सातारा येथे ८ ते ९ जुलै २०२४ रोजी करण्यात आली.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील संघांनी भाग घेतला. या राज्यस्तरीय स्पर्धेत सातारा जिल्ह्याने प्रतिष्ठित दुसरी जनरल ट्रॉफी जिंकून मोठे यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंना केरळ मधील तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहे.आणि याच राष्ट्रीय स्पर्धेतून खेळाडूंची निवड शासकीय “खेलो इंडिया युथ गेम्स” आणि “नॅशनल गेम्स” म्हणजेच भारतातील ऑलिंपिक्ससाठी केली जाते.
या यशामध्ये सातारा जिल्हा कलारिप्पयट्टू संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऋग्वेद वाळिंबे यांचे मोठे योगदान आहे.
याशिवाय,आमच्या गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडेमीच्या खेळाडूंनीही मोठ्या प्रमाणात पदके जिंकून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे ते खालिल प्रमाणे.
ऋग्वेद वाळिंबे – २ सुवर्ण, कौस्तुभ वाळिंबे – २ सुवर्ण, १ रौप्य.
सिद्धी कांबळे – १ सुव्रर्ण, प्रज्ञा पाटील – १ सुव्रर्ण,
प्रतिक लिमकर – १ सुव्रर्ण, हर्षवर्धन पवार – १ रौप्य,
रुद्र पटेल – १ कास्य, युवराज कांबळे – १ कास्य,
प्रदीप माने सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच
गुरूकुल स्पोर्ट्स अॅकॅडमीचे अध्यक्ष नीलेश वाळिंबे यांनीही हे यश मिळविण्यासाठी खूप मदत केली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
गुरूकुल स्पोर्ट्स अॅकॅडमी, ब्राह्मण आळी, शिरवळ, ता-खंडाळा,जिल्हा-सातारा. पिन-४१२८०१.मो. ९७६४२००१२३.