शाळेसाठी जागा देणाऱ्या कांबरे खे.बा.तील दानशूर व्यक्तींचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान.
नसरापूर( प्रतिनिधी): भोर तालुक्यातील कांबरे खे.बा येथील सातबाराचा ब्लॉक न काढल्यामुळे काल भोर तहसिल कार्यालयात झालेल्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आले असल्याची माहिती शिवश्री.सिध्दार्थ कोंढाळकर सरचिटणीस, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड यांनी दिली आहे.
कांबरे खे.बा.चे ग्रामस्थ महादेव चव्हाण (माजी पोलीस पाटील), सत्यवान चव्हाण,भरत चव्हाण, सुरेश चव्हाण यांनी त्यांची जमीन गावातील शाळेसाठी ग्रामपंचायतीचा नावाने दान दिली. सर्व गावाचा वतीने तहसिलदार भोर राजेंद्र नजन,दुय्यम निबंधक भोर कुलकर्णी यांच्या वतीने चव्हाण कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. शाळेसाठी स्वतःची जमीन दान करणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक तालुक्यातील अनेक नागरिकांनी केले.
यावेळी कांबरे खे.बा.चे सरपंच सागर शिंदे, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर, सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ कोंढाळकर ,दादासाहेब शेलार वन समिती अध्यक्ष ,ग्रामपंचायत सदस्य दशरथ मांढरे ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग कोंढाळकर, कायदेशीर सल्लागार वकील मंगेश कोंढाळकर तंटामुक्ती अध्यक्ष रामदास यादव, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब चव्हाण, शेतकरी महादेव बबन चव्हाण मा.पोलीस पाटील सत्यवान बबन चव्हाण ,सुरेश बबन चव्हाण ,भरत बबन चव्हाण, ग्रामसेवक स्वाती महांगरे मॅडम, पोलीस पाटील सुमेध कांबळे व ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.