पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी
कार्यकारी संपादक सागर खुडे
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भोर – अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील भोर, (वेल्हा,)राजगड,मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यांतील सर्व प्राथमिक शाळांना दोन दिवसांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून २० ऑगस्ट व २१ ऑगस्ट रोजी सर्व शाळा बंद राहणार आहेत. या काळात शिक्षक व विद्यार्थी यांनी शाळेत उपस्थित राहू नये, असे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकवाडी यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.”
त्यामुळे या तालुक्यांतील शाळा सोमवार व मंगळवारी बंद राहणार असून बुधवारपासून पुन्हा नियमितपणे सुरू होतील.


