भोंगवली–कामथडी गटात बाठे–सोनवणे जोडीचा प्रचार जोरात; विकासासोबत आरोग्याचा विश्वास


मंगेश पवार

भोर (प्रतिनिधी): भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचार दिवसेंदिवस वेग घेत असून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार चंदकांत बाठे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासकामे, रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण यावर सविस्तर चर्चा केली जात आहे. गावागावातून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बाठे यांनी विघ्नहर्ता प्रतिष्ठान व पतसंस्थेच्या माध्यमातून तालुक्यात अनेक उद्योजक घडवले. उद्योगातील अडचणी समजून घेऊन कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आर्थिक पाठबळ दिले आहे. पांडे येथे भव्य क्रिकेट मैदानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न युवकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहेत. गोरगरिबांची कामे तातडीने करणे, गरज भासल्यास स्वखर्चातून निधी टाकून गावागावातील छोटे-मोठे रस्ते व विकासकामे पूर्ण करणे, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे ग्रामस्थ सांगतात. माणसांत मिसळणारा नेता म्हणून तालुक्यात त्यांची ओळख निर्माण झाली असून अनेकजण त्यांना कामाचा माणूस म्हणतात.

ADVERTISEMENT

या प्रचारात पंचायत समिती भोंगवली पंचायत समिती गणासाठी उमेदवार अक्षय सोनवणे यांचीही प्रभावी उपस्थिती दिसून येत आहे. सोनवणे यांनी आतापर्यंत सारोळे व पूर्व भागातील प्रत्येक गावातील गरजू रुग्णांना स्वखर्चाने दवाखाना व उपचारांची मदत केली आहे. मोतीबिंदू, हृदयविकार, पोटाचे विकार यांसह अनेक मोठ्या शस्त्रक्रिया स्वतःच्या खर्चाने करून दिल्यामुळे परिसरात त्यांना ‘आरोग्यदूत’ म्हणून संबोधले जाते.

तसेच पांडे येथील क्रिकेट मैदानासाठी सोनवणे यांनी मोलाची मदत केली असून युवकांना खेळ, शिक्षण व उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य केले आहे. बाठे–सोनवणे या जोडीमुळे विकासासोबतच आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा विश्वास मतदारांमध्ये अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.

युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा प्रचारात वाढता सहभाग पाहता भोंगवली–कामथडी गटातील निवडणूक लढत निर्णायक व लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!