भोंगवली पंचायत समिती निवडणूक चुरशीची; गणेश तात्या निगडे यांना वाढता प्रतिसाद


मंगेश पवार

भोर तालुक्यातील भोंगवली पंचायत समिती गणासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.

ग्रामपातळीपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गणेश तात्या निगडे यांना स्थानिक नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोंगवली गणामध्ये राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद वाढताना दिसत असून, आगामी निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या निधनानंतर पक्षावर शोककळा पसरली असली, तरी त्यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत. “अजित दादांचे विकासाचे स्वप्न पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी भावना गणेश तात्या निगडे यांनी व्यक्त केली.

भोंगवली पंचायत समिती गणात रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करून जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार निगडे यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून, विरोधी पक्षही रणनीती आखण्यात गुंतले आहेत.

आगामी काळात प्रचारात आणखी वेग येणार असून, भोंगवली पंचायत समिती गणातील ही लढत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!