अवकाळी पावसाने पुणे विस्कळीत; उपमहापौर वाडेकर रस्त्यावर
पुणे प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर
सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पुण्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचणे, ड्रेनेज तुंबणे, झाडे पडणे तसेच काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
ADVERTISEMENT
या पार्श्वभूमीवर परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी कार्यशील उपमहापौर परशुराम वाडेकर स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी विविध भागांची पाहणी करून महापालिकेच्या संबंधित विभागांना तात्काळ काम करण्याच्या सूचना दिल्या.
बोपोडी परिसरासह विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचरा हटविण्यात आला असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.


