गॅस टंचाईविरोधात पुण्यात 6 एप्रिलला वंचितकडून आंदोलनाचा इशारा
पुणे प्रतिनिधी | एस.एन. नांदेडकर
घरगुती गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाला आता आंदोलनाचे रूप मिळत आहे. बेरोजगारी, वाढती महागाई आणि गॅसची अनुपलब्धता यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असून या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
केंद्र सरकार व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ पुण्यात येत्या 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “चुल पेटवून आंदोलन” करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनात प्रत्यक्ष “चुल पेटवून” शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असून “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या घोषणांनी परिसर दणाणून जाण्याची शक्यता आहे.
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे स्वयंपाकाच्या मूलभूत गरजाही भागवणे कठीण झाले आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.तेंव्हा सुजाण नागरीक पुणेकरांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात वंचित बहूजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने करण्यात आले आहे.


