राजापूर गावात युवकांच्या एकजुटीने रात्रभर झटून वीजपुरवठा सुरू
मंगेश पवार
गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने निर्माण झालेल्या अंधाराच्या संकटावर मात करण्यासाठी राजापूर गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने रात्रभर प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर रात्री दोन वाजेपर्यंत मोहिम फत्ते केली. युवक वर्गाने पुढाकार घेत अखंड मेहनत करून गावात पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यात यश मिळवले.

या मोहिमेत महेश बोबडे, हर्षद बोबडे, माऊली बोबडे, गणेश गुडगुडे यांनी विशेष परिश्रम घेत निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शेवटी गावात लाईट सुरू झाली आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
यावेळी बाळासाहेब बोबडे, ॲड. पांडुरंग बोबडे, भरत बोबडे, संतोष बोबडे, ज्ञानेश्वर बागल, प्रमोद बोबडे, गजानन बोबडे, अशोक बोबडे, महेश बापू बोबडे, गोविंद बोबडे, सागर बोबडे, तुकाराम बोबडे, दिलीप बागल, अरुण पवार, प्रसाद बोबडे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, वीजपुरवठ्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून उर्वरित कामासाठी उद्या एमएसबी कार्यालयात जाऊन वायरिंग व फ्युज बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


