जावळी तालुक्याचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांचा ७५ वा अमृत महोत्सव वाढदिवस विशेष रविवारी साजरा होणार.
सातारा: बजरंग चौधरी
महाबळेश्वर : तालुक्यातील अहिर गावच्या सर्जे भावकीतीचे ज्येष्ठ नागरिक व सध्या मेढा येथे स्थायिक झालेले मेढा नगरीतील एक मनमिळावू व्यक्तिमत्व ज्यांना काहीजण भाऊ तर काहीजण अण्णासाहेब म्हणून ओळखत असलेले जावली तालुक्याचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार ह. भ. प. पांडुरंग नारायण संकपाळ यांचा आज ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस त्यानिमित्त……!
महाबळेश्वर तालुक्यातील कोयनेच्या डोंगरकपारीत वसलेले सुंदर असे अहिर गांव. पुर्वी कोयना
विभागातील असंख्य कुटुंब आपल्या उदरनिर्वाहा साठी व कामानिमित्त कराची (पाकीस्तान) येथे गेली होती.
यातीलच अहिर गावचे सर्जे कुळात जन्मलेले नारायण दादा अहिरे (संकपाळ), त्यांची पत्नी लक्ष्मीबाई व बहिण
ताईबाई अहिरे या कुटुंबात भाऊंचा जन्म ५ जुलै १९४९ रोजी जावली तालुक्यातील मेढा येथे झाला. मेढा येथे
आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून वयाच्या १९ व्या वर्षी आपले वडील वै. वा. ह. भ. प. नारायण रामचंद्र
संकपाळ (रिटायर्ड सर्कल मेढा) यांच्या कृपा आशीर्वादाने व तत्कालीन प्रांत अधिकारी पी. आर. आळवेकर
यांच्या आदेशानुसार सन १९६९ साली तलाठी पदावर नोकरीला लागले, सुरवातीला जावली तालुक्यातील
काळोशी गावाचा सजा व गोगवे गावचा सजा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. आपल्या मनमिळाऊ व मृदू
स्वभावातुन अनेकांची मने जिंकून आपल्या शासकीय सेवेतून अडल्या, नडल्या लोकांची कामे पूर्णत्वास नेऊन
शासनदरबारी आपल्या कामाचा ठसा उमटवला. सलग ३९ वर्षे जावली तालुक्यात लोकांची सेवा करण्याची संधी
त्यांना मिळाली. तदनंतर लोक त्यांना संकपाळ अण्णासाहेब म्हणून हाक मारू व ओळखु लागली. शासकीय सेवेत
असताना भाऊंना सातारा उपविभागीय अधिकारी पी. आर. आळवेकर, दिलीप बंड, राजेंद्र
चव्हाण, तसेच जावली तालुक्यातील तहसीलदार मुंढेकर,मिस्त्री,एस. एस.
जाधव,भास्करराव कांबळे,के. टी. साळुंखे यांचे हाताखाली काम करण्याची संधी
मिळाली.
आपली शासकीय सेवा सुरू असताना १९७२ रोजी सोळशी विभागातील कुरोशी गावचे तत्कालीन सरपंच आत्माराम गोविंद शिंदे यांची मुलगी कमल हिच्याशी भाऊंच विवाह संपन्न झाला.
तलाठी म्हणून जावली तालुक्यातील दक्षिण विभाग, केळघर विभाग कुडाळ विभागात तसेच सातारा नुने येथे आपल्या शासकीय कामातून अनेक लोकांची सेवा केल्याबद्दल व उत्कृष्ट कामासाठी तत्कालीन उपविभागीय अधिकारी दिलीप बंड यांनी पांडुरंग संकपाळ भाऊ यांना दोन वेतन वाढ देऊन गौरविण्यात आले होते. या त्यांच्या कामाची दखल घेऊन श्रीकृष्ण आध्यात्मिक ट्रस्ट पुणे यांनी सन २००५ रोजी भाऊंना भगवान श्रीकृष्ण सेवा राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सन २००६ रोजी मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र यांनी उत्कृष्ट शासकीय सेवेबद्दल गुंणीजन रत्न गौरव पुरस्कार देऊन भाऊंचा सत्कार करण्यात आला होता.
शासकीय सेवेत असताना त्यांनी जावली तालुक्यातील सर्व तलाठ्यांना एकत्र घेऊन एक तलाठी
पतसंस्थेची स्थापना केली व त्यावेळी पतसंस्थेमध्ये चेअरमन पदी काम करून आपल्या लोकांच्या अडी अडचणी
सोडवण्याचा प्रयत्न केला वेळे प्रसंगी जिल्हाधिकारी सातारा येथे जाऊन लोकांची कामे पार पाडली. त्यामुळे
जिल्हाधिकारी कार्यालयात देखील भाऊंना माननारा कर्मचारी वर्ग त्यांना आदराने विचारत असत. आपल्या
नोकरीच्या कालावधीत भाऊंना सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले व सन
२००७ रोजी मौजे मोहाट तालुका जावली येथे मंडळ अधिकारी म्हणून व नंतर नायब तहसीलदार म्हणून आपल्या
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी अध्यात्मिक वर्गात प्रवेश केला व ते पांडुरंग व ज्ञानोबाराय यांचे निस्सीम भक्त झाले. अजूनही ते आळंदी ते पंढरपूरची वारी करीत असतात. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आजही मेढा येथे दिपावली मध्ये साजरी करण्यात येणारी काकड आरतीमध्ये ते सहकुटुंब भाग घेतात. सन २००९ पासुन ते जावली तालुक्यातील जगद्गुरु श्री तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार व जावली तालुका वारकरी संघाचे खजिनदार पदी काम करीत असून ट्रस्टच्या माध्यमातून जावली तालुक्यातील विविध ठिकाणी वारकरी मेळावे घेऊन नामस्मरण प्रवचन हरिपाठ चर्चासत्रामध्ये भाग घेत असतात. जावली तालुक्यात श्री. तुकोबारायांचे मंदिर बांधण्याचे ध्येय सर्व ट्रस्टच्या पदाधिकारी यांनी बांधले असुन त्याचा पाठपुरावा ही चालु आहे.
भाऊंना दत्तात्रय, ज्ञानेश्वर, नारायण ही भावंडे तसेच रूक्मिणी, पार्वती व मुक्ताबाई या तीन बहीणी असुन दोन मुले (संतोष व शिवाजी) व दोन मुली (निता व गीतांजली) तसेच नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे. असे वारकरी सेवेत मग्न असणारे व लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे आमचे सर्वेसर्वा, गुरुवर्य वडील माननीय श्री. पांडुरंग नारायण संकपाळ यांना ग्रामस्थांच्या वतीने, नातेवाईक आणि परिवार यांच्यातर्फे अमृत महोत्सवी वर्षाच्या शतकोत्तर आदरपूर्वक शुभेच्छा.चांगल्या भावना आणि रदयस्पर्शी असे कितीतरी मन मोहक क्षण.


