सामान्य शेतकऱ्याचं पोर! डॉ. नितीन उत्तमराव सावंत
उपसंपादक : दिलीप वाघमारे
सुशिक्षित पण सामान्य शेतकऱ्यांच पोर उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर झाला ग्रामीण भागात जनतेचे सेवा करण्याचा वडिलांचा मानस घेऊन अखंडित जनसेवेसाठी लोणंद येथे ग्रामीण भागात सुसज्ज असं रुग्णालय चालू करून कॅथ लॅब सिटी स्कॅन सारख्या आत्याधुनिक मशीन घेऊन सुविधा अल्प दरात ग्रामीण भागात उपलब्ध करून देणारा हा अवलिया.
खरंतर आपण भलं आणि आपला व्यवसाय भला ही मानसिकता असलेली तरुण पिढी आपण पाहतो पण आपली नाळ शेतीशी ठेवणारा हा उच्चशिक्षित तरुण. शेतकऱ्यांचे हित समजून शेतकरी कुशल व्हावा व समृद्ध व्हावा या कल्पनेने लोणंद शहरात सलग सहा वर्ष झाले शरद कृषी महोत्सवाचे आयोजन अगदी दिमाखात म्हणजे मोठ्या मोठ्या संस्थेंना लाजवेल असं केलं जातं आणि अखंडित करणारा शेतकऱ्यांचा सुपुत्र.
कोरोना काळात फक्त व्यवसाय करणारे खूप डॉक्टर होते पण त्यांनी मात्र शरद अन्नछत्र उभारून गोरगरिबांची अन्नपाण्याची सेवा केली तब्बल तीन महिने दोन टाईम गरिबांचे जनतेला मोफत अन्नदान करून सामान्य आणि गरिबांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं कोरोनात केलेल्या कामाची दखल राज्य सरकारला घ्याववी लागली ही लोणंद च्या जनतेचे भाग्यच
तसेच लागून लगेचच झालेल्या लोणंद च्या नगरपंचायत निवडणुकीत आपण राजकारणातही सक्रिय असून काय करू शकतो याची चुणूक दाखवलेला हा समाजकारणी तथा राजकारणी
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात झालेली घडामोड पाहता देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार पवार साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आपण साहेबांबरोबरच राहण्याचा योग्य निर्णय घेतला याचा सार्थ अभिमान वाई खंडाळा महाबळेश्वरच्या जनतेला आहे.
शब्दांकन: दिलीप वाघमारे
उपसंपादक पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज


